Click to change the language

  

#
#
DTE CODE - 6004, PUNE University CODE - cegp014980, Pune University Exam. Center No. : 4078, Automobile Engg. & Mechanical Engg. Programmes are accredited by NBA upto 2024-25

News & Events

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात “सायबर गुन्हेगारीशोधन्याच्या संधी व आव्हाने: खबरदारी व रणनीतीद्वारे महीलांचे सबलीकरण"या वरती एकदिवसीयवेबिनार दि.१५ डिसेंबर २०२० रोजी संपन्न झाला.सदरील वेबिनार चे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ ए.एस.पंत ,डॉ सचिन देशमुख (प्राध्यापक डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद ) डॉ. डी. आर. पानगव्हाणे (संयोजक) उपस्थित होते. सदरील कार्यशाळा ही राष्ट्रीय महिला आयोग, नवी दिल्ली द्वारे प्रायोजित करण्यात आली व पूर्ण अनुदान त्यांच्या तर्फे करण्यात आले.

उद्घाटन प्रसंगी श्री. अभिजित डेरे म्हणाले की, उद्योजकता विकास करण्याकरिता आपणामध्ये सतत शिकून घेण्याची वृत्ती असली पाहिजे व कामामध्ये सातत्य टिकवून ठेवणे गरजेचे आहे. तसेच त्यांनी उदयोजका कडे असावे लागणारे गुणधर्म यावर मार्गदर्शन केले.

उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ ए.एस.पंत यांनी सांगितले की “ या वेबिनारच्या आयोजनामुळे महिलांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण होईल व त्यांना या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी व वैयक्तिक प्रेरणा मिळेल. सध्याच्या काळात सायबर सुरक्षेची प्रचंड मागणी आहे. महिला मध्ये सायबर गुन्हेगारीशोधन्याची क्षमता निर्माण होईल” श्री. आर. पी.काकडे यांनी वेबिनारचे प्रस्ताविक केले व डॉ. डी. आर. पानगव्हाणे कार्यशाळेचे महत्व विषद करताना सांगितले की ” आजच्या जागतिक कोव्हीड-१९ महामारीच्या काळात सर्व व्यवहार हे ऑनलाईन डिजिटलकेले जात आहेत ,परंतु सायबर गुन्हेगारी वाढत चालली आहे.सायबर गुन्हेगारीस प्रतिबंध करणेडीजीटल सामाजिक माध्यमे प्रभावीपणे कशी वापरता येतील याचा अभ्यास करणे ही आजच्या काळाची गरज आहे.”

शसदरील वेबिणार मध्ये एकून १०० महिला व महाविद्यालयीन युवती,विद्यार्थिनी उपस्थित होत्या सदरील एकदिवसीय ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून सायबर क्राईम या विषयातील विविध नामांकित तज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन करण्यात आले. डॉ सचिन देशमुख (प्राध्यापक डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद ),यांनीसायबर गुन्हेगारीशोधन्याच्या संधी व आव्हाने,डेबिट / क्रेडिट कार्ड फसवणूक, व्हायरस, वर्म्स, स्पॅमिंग आणी फिशिंगयाबाबत मार्गदर्शन केले .

श्री विकास नाईक (डिजिटल इन्व्हेस्टिगेशन लेखक, यूपीआरआयएसईनाशिक सायबर गुन्हे अन्वेषण विभाग)यांनी सायबर गुन्हेगारी शोषण, मोबाईल सुरक्षितता, मुलींनीसोशल मीडिया वर घ्यावयाची काळजी,, वेगवेगळ्या डेटाची सुरक्षा, स्त्रियांवरील सायबर गुन्ह्यांचे प्रकार, वास्तविक उदाहरणे देवून मार्दर्शन केले . श्री. साईप्रसाद कुलकर्णी (सायबर फॉरेन्सिक्स तज्ज्ञ सुरक्षा विश्लेषकनाशिक) यांनी सायबर क्राइममधील प्रतिबंधक कायदेशीर उपाय, डार्क वेब कन्सेप्ट, विविध डिजिटल अॅशप्सच्या वापरादरम्यान होणारे सायबर गुन्हे, सायबर गुन्हे नोदणी प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले .

अॅड. राजेश्वरी बालाजीवाले (सायबर लॉ, यूपीआरआयएसई, नाशिक,आयपीआर आणि मानवाधिकार)यांनी सध्याचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सायबर कायदे यावरती मार्गदर्शन केले . अर्चना दहीवाल (ज्येष्ठ पत्रकार,विहा मीडियासंस्थापक).यांनी डिजिटल युगातील सायबर गुन्हेगारीविरूद्ध महिला सशक्तीकरण, खबरदारीच्या उपाययोजना यावरती महत्व पूर्ण मार्गदर्शन केले .

वेबीनारच्या आयोजनाकरिता महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. अविनाश पंत यांचे मार्गदर्शन लाभले,वेबिणाररच्या समारोप प्रसंगी अर्चना दहीवाल (ज्येष्ठ पत्रकार,विहा मीडिया संस्थापक) उपस्थित होत्या .सहभागी महिला व महाविद्यालयीन युवती,विद्यार्थिनी यांना ऑनलाईन पद्धतीने प्रमाणपत्र वाटप करण्यात आले .

या शिबिराच्या आयोजनाकरीता प्रकल्प अधिकारी व संयोजक म्हणून डॉ. डी. आर.पानगव्हाणे, सहसंयोजक म्हणून डॉ. एस.बी.खरमाळे ,समन्वयक व सह समन्वयक म्हणून अनुक्रमे श्री. आर. पी.काकडे , श्री.डी.एस.लेंगरे यांनी काम पहिले. श्रीमती ए . व्ही.कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

 


                                          Developed & Managed by   Government College of Engineering & Research Avasari ,Pune.
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                   
Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
  Best accessible in Google Chrome - 1024x768 Resolution
https://www.Symptoma.es
Website last updated on: