Click to change the language

  

#
#
DTE CODE - 6004, PUNE University CODE - cegp014980, Pune University Exam. Center No. : 4078, Automobile Engg. & Mechanical Engg. Programmes are accredited by NBA upto 2024-25

News & Events

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पानगव्हाणे यांनी भूषविले. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व वंदनमुर्ती म्हणून माजी सैनिक श्री. ज्ञानेश्वर डोके, श्री. गुलाब शिंदे, श्री.दत्तात्रय कराळे, श्री. संजय खेडकर, श्री. माणिक शिंदे, श्री. सुर्यकांत भोर, श्री. हनुमंत भोर यांची उपस्थिती लाभली.

प्रमुख पाहूणे म्हणून लाभलेल्या सर्व माजी सैनिकांचे जोश पूर्ण स्वागत राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक शेषराव गुंड याने आपल्या भाषणाने व सुजाता बिरादार हिने सैनिकांवर लिहिलेली स्वरचीत कवितेने करण्यात आली. प्रमूख पाहुण्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

या कार्यक्रमामध्ये आंबेगाव परिसरातील माजी सैनिकांचा सन्मान शाल, श्रीफळ व देशी वृक्षांची रोपे देऊन करण्यात आला. त्यांचे बहुमोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. सैन्यदलातील श्री. ज्ञानेश्वर डोके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी भान ठेऊन नियोजन केलं पाहिजे आणि बेभान होऊन ते अमलात आणल पाहिजे असे सांगितले. त्यचबरोबर वायुदलातील श्री. सूर्यकांत भोर यांनी त्यांचा शैक्षणिक प्रवास विद्यार्थ्यांना सांगितला. तसेच आरोग्य आणि शिस्त याबद्दलही मोलाचे मार्गदर्शन केले. नौदलातील श्री. संजय खेडकर यांनी शत्रूशी लढताना झालेल्या चकमकीचे किस्से विद्यार्थ्यांना सांगितले.

भारतीय सैन्यदल, वायुदल आणि नौदल या संरक्षण दलांमधील विस्मयकारक कथा जाणून घेण्याची आणि रणांगणावरील त्यांचे धाडसी क्षण पुन्हा जिवंत करण्याची अनोखी संधी या कार्यक्रमाने महाविद्यालयातील विद्यार्थी व माजी सैनिक यांना दिली. या कार्यक्रमाच्या आयोजनातून आपल्या देशाच्या अखंडतेचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करणाऱ्या वीरांना अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमामध्ये देशप्रेम, देशाच्या विकासासाठी युवकांचे योगदान तसेच ध्येय प्राप्तीसाठी गरजेचे असलेले सातत्य, चिकाटी, मेहनत, शिस्त अशा अनेक गोष्टींचे मंथन झाले. कार्यक्रमाची सांगता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पानगव्हाणे यांच्या अध्यक्षीय मार्गदर्शनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक कुमारी निकिता गोरे आणि कुमार प्रतीक पाटील यांनी केले.

सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी समन्वयक कुमार प्रशांत ढोले, कुमारी चारुशीला पानवळ आणि सर्व रासेयो स्वयंसेवक यांनी केले. याकरिता राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पानगव्हाणे व रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. मंगेश पांचाळ यांचे मार्गदर्शन लाभले.

>