Click to change the language

  

#
#
DTE CODE - 6004, PUNE University CODE - cegp014980, Pune University Exam. Center No. : 4078, Automobile Engg. & Mechanical Engg. Programmes are accredited by NBA upto 2024-25

News & Events

महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर नवमतदार नोंदणी व्हावी, तसेच प्रत्येक पात्र विद्यार्थ्याचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ठ व्हावे याकरिता मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे अंतर्गत सर्व महाविद्यालयांमध्ये दि. १४ सप्टेंबर, २०२३ रोजी ‘विशेष नवमतदार नोंदणी अभियान’ राबविण्याबाबत सूचित केले होते. त्यानुसार शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी (खुर्द) येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून दि. १४ सप्टेंबर, २०२३ रोजी विशेष नवमतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले.

भारत निवडणूक आयोगाने दि. १ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक प्रक्रिया सर्वसमावेशक व्हावी यासाठी हा कार्यक्रम महत्वाचा आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार नागरिकांना वर्षातून चार वेळा म्हणजेच १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै, १ ऑक्टोबर या अर्हता दिनांकावर मतदार नोंदणी करता येणार आहे.

मतदार यादी हा लोकशाहीचा पाया असून ती सशक्त करण्यासाठी मा. भारत निवडणुक आयोग तसेच मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांच्या निर्देशानुसार शासकीय अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालय, अवसरी खुर्द येथे नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी “विशेष नवमतदार नोंदणी अभियान” दि. १४ सप्टेंबर, २०२३ रोजी राबविण्यात आले. यामध्ये महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी मतदारांची नोंदणी वाढविण्याकरिता मतदारांमध्ये जनजागृती करून नवमतदारांची ऑनलाईन नोंदणी केली. मतदार यादी अदयावत करणे हे राष्ट्रीय कर्तव्य असून सदर कर्तव्यामध्ये महाविद्यालयाने बहुमोल सहभाग दाखविला. या अभियानांतर्गत महाविद्यालयातील १५० नवमतदारांची नोंदणी करण्यात आली.

सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी समन्वयक कुमार प्रशांत ढोले, कुमारी चारुशीला पानवळ आणि सर्व रासेयो स्वयंसेवक यांनी केले. याकरिता राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पानगव्हाणे व रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. मंगेश पांचाळ यांचे मार्गदर्शन लाभले.