Click to change the language

  

#
#
DTE CODE - 6004, PUNE University CODE - cegp014980, Pune University Exam. Center No. : 4078, Automobile Engg. & Mechanical Engg. Programmes are accredited by NBA upto 2024-25

News & Events

महाविद्यालयातील अंतर्गत तक्रार समिती ICC (Internal Complaint committee) द्वारे महिलांच्या हक्कांची सर्वांनाच जाणीव करून देणारा मराठी कथा अभिवाचनाचा एकपात्री कार्यक्रम दि. १२/०९/२०२३, मंगळवार रोजी आयोजित करण्यात आला होता.

सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय लेखक व अभिवाचक मा. श्री. संदीप महसूर यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. डॉ. मनोज नागमोडे यांनी भूषविले. त्यानंतर ICC प्रमुख प्रा. डॉ. श्रीमती वंदना इनामदार यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. ICC उपप्रमुख प्रा. श्रीमती एच. एच. राक्षे यांनी ICC समिती सदस्यांची ओळख करून दिली. त्याचप्रमाणे समन्वयक प्रा. श्रीमती साईली कुलकर्णी यांनी प्रमुख पाहुण्यांच्या कारकीर्दीचा आढावा उपस्थितांना करून दिला व मराठी कथा अभिवाचनाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली .

आदरणीय श्री. संदीप महसूर सरांनी एका कौटुंबिक कथेतून महिलांसाठी 'सेफ वर्कप्लेस ' या विषयावर मार्गदर्शन केले. अनेक महिलांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाला सामोरे जावे लागते. त्यांनी त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध पळवाटा न शोधता स्वतः खंबीरपणे सामोरे गेले पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच कुटुंबातील प्रत्येक सदस्याने महिलांना मनमोकळे विचार मांडण्याचा अधिकार आणि पाठिंबा दिला पाहिजे. महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण मिळणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. अशाप्रकारे श्री. संदीप सरांनी अनेक विषयांचा संदर्भ देवून महिलांचे सक्षमीकरण व त्यासाठी कार्यरत असणाऱ्या वेगवेगळया NGO's व ICC याची कार्यपद्धती समजावून सांगितली.

सदर कार्यक्रमाचा लाभ सर्व शिक्षक, कर्मचारी वर्ग व विद्यार्थी यांनी घेतला. ICC विद्यार्थी सदस्य कु. जान्हवी देशपांडे, कु. हर्षदा मोरे, कु. अदिती खैरनार यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. कु. श्रृती काळे हिने सूत्रसंचालन तसेच कु. श्वेता काटे हिने कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. अशाप्रकारे ICC अंतर्गत आयोजित मराठी कथा अभिवाचनाचा कार्यक्रम पार पडला.