Click to change the language

  

#
#
DTE CODE - 6004, PUNE University CODE - cegp014980, Pune University Exam. Center No. : 4078, Automobile Engg. & Mechanical Engg. Programmes are accredited by NBA upto 2024-25

News & Events

अवसरी खुर्द : शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी (खुर्द) व ग्लोबल टॅलेंट ट्रॅक पुणे यांच्यामध्ये सामंजस्य करारा झालेला आहे .सदरील करारा नुसार व बारकलेज यांच्या सी.एस.आर. तथा उद्योगाची सामाजिक दायीत्वे अंतर्गत चार दिवसीय बुद्धिमत्ता चाचणी ( एप्टिट्यूड ) कशी उत्तीर्ण करावी याचे ऑनलाइन प्रशिक्षण विद्यार्थ्यानादेण्यात आले. दि. २०,२१,२७ व २८ फेब्रुवारी २०२१ रोजी दररोज चार तास ऑनलाइन प्रशिक्षण पार पडले. संस्थेचे प्राचार्य डॉ. ए. एस. पंत या प्रसंगी म्हणाले की “बुद्धिमत्ता चाचणी (एप्टिट्यूड ) उत्तीर्ण होणे ही नोकरी मिळवताना ची पहिली महत्वपूर्ण पायरी आहे त्यामुळे विद्यार्थ्यानी सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे.” डॉ. सदानंद देशपांडे, (प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी ) यांनी सदरील प्रशिक्षण आयोजनामुळे “विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल वप्लेसमेंट वाढेल असे सांगितले”

ग्लोबल टॅलेंट ट्रॅक च्या तज्ञ प्रशिक्षकांकडून अंतिम व उपांत्य वर्षाच्या एकूण ६६ विद्यार्थ्यानी प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ग्लोबल टॅलेंट ट्रॅक पुणे यांच्या मार्फत प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली . श्री. राहुल राय (की अकाऊंट मॅनेजर, ग्लोबल टॅलेंट ट्रॅक पुणे) व महाविद्यालया तर्फे डॉ. सदानंद देशपांडे, प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी (TPO) यांनी समन्वयक म्हणून म्हणून काम पहिले.

 


                                          Developed & Managed by   Government College of Engineering & Research Avasari ,Pune.
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                   
Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
  Best accessible in Google Chrome - 1024x768 Resolution
https://www.Symptoma.es
Website last updated on: