Click to change the language

  

#
#
DTE CODE - 6004, PUNE University CODE - cegp014980, Pune University Exam. Center No. : 4078, Automobile Engg. & Mechanical Engg. Programmes are accredited by NBA upto 2024-25

News & Events

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी खुर्द येथे महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती जन्म शताब्दी निमित्त दि. ११/०९/२०१९ ते दि. २७/१०/२०१९ या कालावधीमध्ये “स्वच्छता हीच सेवा” हे अभियान सर्व संस्थास्तरावर व्यापक स्वरुपात राबविण्यासाठी नियोजन करण्यात आलेले आहे. महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुखांनी दि. ११/०९/२०१९ ते दि. ०१/१०/२०१९ या विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांची एकत्रित बैठक घेऊन आपला विभाग प्लास्टिक मुक्त करण्याबाबत जागृती निर्माण केली. तसेच विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांच्या एकत्रीत श्रमदानातून आपला विभाग प्लास्टिक मुक्त केला. विभागामध्ये श्रमदानातून संकलीत केलेला प्लास्टिक कचरा संस्थेने एकत्रीत जमा करून रीसायकलिंग (Recycling) साठी देण्यात येणार आहे .

प्रभारी प्राचार्य मा. प्रा. एस. व्ही. जोशी यांनी महाविद्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांना स्वच्छता शपथ दिली.यानंतर महाविद्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांनी दि.०१/१०/२०१९ रोजी ठीक १०:३० वाजता महात्मा गांधीजी यांची १५० व्या जयंतीनिमित्त संस्थास्तरावर सर्व अधिकारी, कर्मचारी व विध्यार्थी यांच्या सामुहिक श्रमदानातून महाविद्यालय परिसर प्लास्टिक मुक्त केला.

महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख ,अधिकारी, कर्मचारी राष्ट्रीय सेवा योजना (N.S.S.) व विद्यार्थी यांनी उस्फुर्तपणे स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला. सदरील स्वच्छता मोहिमेचे समन्वयक म्हणून डॉ.एन.पी.फुटाणे (जिमखाना अधिकारी) प्रा. मंगेश पांचाळ (राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख) यांनी काम पाहिले.,

 


                                          Developed & Managed by   Government College of Engineering & Research Avasari ,Pune.
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                   
Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
  Best accessible in Google Chrome - 1024x768 Resolution
https://www.Symptoma.es
Website last updated on: