Click to change the language

  

#
#
DTE CODE - 6004, PUNE University CODE - cegp014980, Pune University Exam. Center No. : 4078, Automobile Engg. & Mechanical Engg. Programmes are accredited by NBA upto 2024-25

News & Events

अवसरी : 'दूरदर्शन' व 'आय.आय.टी. दिल्ली यांच्या समन्वयाने आयोजित करण्यात आलेल्या " ए बी यू राष्ट्रिय रोबोकॉन २०२२ " स्पर्धेत शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी (खुर्द) च्या टीम अभेद्य ने उत्कृष्ट असे प्रदर्शन करून महाराष्ट्र राज्यातुन पहिला व भारतातुन द्वितीय क्रमांक पटकावला आहे. सदर स्पर्धा दि. १६ ते १७ जुलै २०२२ रोजी आय. आय. टी दिल्ली तर्फे त्यागराज स्टेडियम दिल्ली येथे भरवण्यात आली होती. महाविद्यालयाचा संघ २१ ऑगस्ट२०२२ रोजी दिल्ली येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रोबोकॉन स्पर्धेकरीता भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. आंबेगावचे नाव देशात झळकवणाऱ्या या अभेद्य संघाची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झाल्यामुळे संघाला प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी माजी ग्रहमंत्री दिलीपराव वळसे पाटील साहेब यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली व संघाचे कौतुक करून शाबास्कीची थाप टाकून अभिनंदन केले आहे.

स्पर्धेमध्ये देशातील नामांकित ४३ अभियांत्रिकी महाविद्यालय शेवटच्या टप्प्यात खेळण्यास पात्र होते. ए बी यू रोबोकॉन २०२२ चे आंतरराष्ट्रीय आयोजक यांनी दिलेली थिम ही “लगोरी ब्रेकिंग आणि पायलिंग करणे” यावर आधारीत होती . व नियमानुसार, स्पर्धेकरीता संघाने दोन रोबोट, रोबोट आर १ आणि रोबोट आर २ बनविले होते. त्यापैकी आर १ रोबोटवर, ओम्नी व्हील ड्राईव्ह, बॉल फेकण्याची यंत्रणा , न्यूमॅटिक सिलेंडर, डिस्टन्स सेन्सर इत्यादी. सेन्सर्स व अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक सिस्टिमचा " उपयोग करण्यात आला . तसेच आर २ रोबोटवर लोकोमोशन साठी मेकॅनम ड्राईव्ह वापरली असून डिस्टन्स सेन्सर, लगोरी उचलनेकरिता पुली व रोप ड्राईव्ह, इत्यादी यंत्रणांचा उपयोग केला होता. दिलेले कार्य आर १ रोबोटने ३ सेकंदात २५ गुण व आर २ रोबोट ने ४५ सेकंद मध्ये ६५ गुण प्राप्त करत पुर्ण केले. टीम अभेद्य ने महाविद्यालयाच्या रोबोटिक रिसर्च लॅब मध्ये अहोरात्र मेहनत घेऊन कठीण परिस्थिती मधून उत्कृष्ठ यश संपादित केले आहे.

संघाचे नेतृत्व सुशांत फलके याने केले असुन रोबोटचे ऑपरेटर श्रेयश इंगळे आणि राहुल शिंदे होते, तसेच त्यांसोबत मदतीला सतीश मुगळे,ओंकार सुरळकर,सोहम भोकरे,जयेश शिंदे, शुभम सिंग, प्राजक्ता खैरमोडे, मंदार डाळिंबे, एकनाथ माळी, साक्षी इंगोले, विशाल मेटकरी, श्रीकांत ठाकरे, श्वेता काटे, यश मावरे, हर्षवर्धन लोखंडे, कुणाल खैरनार, सत्यजित नलवडे, स्वप्नील पारधी, ज्ञानेश्वर शिंदे होते.

सदर कार्यक्रमाकारीता प्रसार भारतीचे अध्यक्ष श्री. मयांक कुमार अग्रवाल उपस्थित होते. संघामध्ये विविध शाखेचे एकूण ३६ विद्यार्थी सहभागी होते. संघ समन्वयक डॉ. एन. पी. फुटाणे यांनी सदर संघास प्रेरणा देवून संघाला मोलाचे मार्गदर्शन केले.केलेल्या उत्कृष्ट कामगिरी साठी डॉ. अभय वाघ (संचालक तंत्र शिक्षण संचालनालय मुंबई) ,डॉ. डी. व्ही. जाधव (सहसंचालक विभागीय कार्यालय पुणे), प्राचार्य डॉ.डी.आर. पानगव्हाणे,डॉ .एम.एस. नागमोडे व सर्व विभागप्रमुख यांनी संघाचे अभिनंदन केले आहे.महाविद्यालय विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय तांत्रीक स्पर्धांमध्ये उत्कृष्ठ कामगिरी करत आहे व यश संपादित करत आहे असे प्राचार्य डॉ.डी.आर. पानगव्हाणे यांनी सांगितले.